"शिवभावे जीवसेवा " हा कान मंत्र घेऊन "शिवसेवा प्रतिष्ठान" सातत्याने कार्यरत आहे. समाजोत्थानाच्या या कार्यात जेवढा अधिक जणांचा सहभाग वाढेल तेवढे हे कार्य सुलभ , समाधानकारक होईल . हा जगन्नाथाचा रथ आहे, अखंड ओढावा लागणार आहे. आपल्या सारख्याच्या हस्ते -परहस्ते सहकार्यानेच हि पूर्तता होऊ शकते, पूणात्वास जाऊ शकते या कार्यात पुढील प्रमाणे आपल्याला सहभाग घेता येईल
१) स्वतः सदस्य होणे व सदस्य वाढवणे.
२) उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे
३) संस्कार वर्ग चालवणे
४) ग्राम विकास
५) अभ्यासीका चालवणे
६) वृक्षारोपण व संवर्धन
७) रक्तगट सूची
८) शासकीय नोकऱ्यांचा प्रचार आणि प्रसार
९) राष्ट्रीय व प्रेरणा दिन साजरा करणे
१०) तरुणांना विविध विषयांत मार्गदर्शन
११) वाचनालय