शिवसेवा प्रतिष्ठान 🚩
डायऱ्या तर आपण सगळेच वापरतो...
पण रोज वापरत असलेल्या या डायरीमध्ये जर आपल्याला ऊर्जा देणार, आपल्याला अभिमान वाटणार ...
आपल्या सर्व कामांमध्ये शक्ती देणारे....
असं काही असेल तर त्याला काही वेगळेच महत्त्व निर्माण होत.
शिवसेवा प्रतिष्ठान तर्फे यावर्षी आपलं आराध्य असलेले 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची थोडी माहिती असलेल त्यांच्या वेगवेगळ्या आदेशांचं संकलन असलेली डायरी आपल्या सगळ्यांसाठी छापायचं ठरवलं आहे...
या डायरीत रोजची तारीख, वार, वगैरे तऱ असेलच पण शिवशका नुसार दिवस कोणता चालू आहे...
हिंदू संस्कृतीनुसार त्या दिवसाचं काय महत्त्व आहे...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात त्या दिवसाला काय महत्त्व आहे...
हेही समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले आदेश आणि त्यांचा हिंदीतून अर्थ दर महिन्याला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे...
हिंदीतून यासाठी की तो सर्व देशभर पसरावा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व किंवा त्यांचे विचार सर्व देशाला कळावेत...
2023 ची हि डायरी आपणा कडे असण्यासाठी आपण शिवसेवा प्रतिष्ठानच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे नोंदणी करू शकता..